Today’s weather forecast: महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचा फटका बसत असून, पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी, आणि नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. पुण्यातही वीजांचा कडकडाट आणि वादळी पावसामुळे अडचण निर्माण झाली आहे. पुढील दोन-तीन दिवसांपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा जोर टिकून राहण्याचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात सध्या अवकाळी पावसाने मोठा फटका दिला आहे. नांदेड, जालना, बीड, आणि लातूर हे प्रमुख जिल्हे पावसामुळे प्रभावित झाले आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद आहे. नांदेड जिल्ह्यातच सुमारे 23,821 हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत, तर जालन्यात 15,080 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे.
इतर मराठवाडा भागांमध्येही गारपीट आणि वादळी पावसामुळे फळबागा आणि शेतीचे नुकसान झाले आहे. प्रशासन पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून लवकरच मदतीचे पॅकेज जाहीर करेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रातील हवामान खात्याने (IMD) येत्या दोन दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, ठाणे, कोल्हापूर, सातारा, आणि सांगलीसह राज्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागांमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो, यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.Today’s weather forecast