Gas Cylinder News: दिवाळीच्या आधी महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे. या योजनेद्वारे बीपीएल रेशनकार्डधारक (पिवळं आणि केशरी कार्ड) कुटुंबांना दरवर्षी तीन मोफत सिलेंडर दिली जातील. या सुविधेचा लाभ साधारणतः ५६ लाख १६ हजार महिलांना मिळणार आहे.
सिलेंडरचा खर्च थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाईल, ज्यामुळे स्वयंपाकघरातील खर्चावर होणारा ताण कमी होईल. ही योजना विशेषतः त्या कुटुंबांसाठी महत्त्वाची आहे ज्यांना स्वयंपाकासाठी इंधनाचा मोठा खर्च करावा लागतो.