Diesel Cars: सध्या सोशल मीडियावर डिझेल वाहनांवर बंदीबाबत अनेक चर्चांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. वास्तविक पाहता, भारत सरकारने डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर तात्काळ बंदी घालण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, ऊर्जा संक्रमण सल्लागार समितीने 2027 पर्यंत मोठ्या शहरांमध्ये डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याची शिफारस केली आहे.
समितीच्या अहवालानुसार, 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये डिझेलवर चालणाऱ्या सार्वजनिक वाहनांची नोंदणी टप्प्याटप्प्याने थांबवून इलेक्ट्रिक वाहने आणि पर्यायी इंधनांवर भर देण्याची योजना आहे. या प्रस्तावानुसार, शहरी भागांतील सिटी बसेसवर देखील 2024 पासून निर्बंध येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल.
सध्या सरकारच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे, आणि कोणत्याही बंदीचे अंमलबजावणीसाठी पर्यायी सुविधा तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवणे आणि चार्जिंग स्टेशनची उपलब्धता सुनिश्चित करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.Diesel Cars