Kapus bajar bhav: आजच्या घडामोडींमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाल्याचे दिसून येते. विदर्भातील बाजारांमध्ये कापसाचे दर प्रति क्विंटल 7,500 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असे अभ्यासकांनी अंदाज व्यक्त केला आहे. मागील आठवड्यात कापसाच्या दरात 400 ते 500 रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, हमीभावाच्या खरेदीत अजून ठोस कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळत नाही.
काही बाजार समित्यांमध्ये सध्या 6,600 रुपयांच्या आसपास कापूस विक्री होत आहे, तर कमी दर्जाच्या कापसाला 5,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळतोय. आंतरराष्ट्रीय बाजारातील दरवाढीमुळेही देशांतर्गत कापूस दरात सुधारणा होत असल्याचे जाणवत आहे.
शेतकऱ्यांनी या दरवाढीचा फायदा घेण्यासाठी बाजाराच्या स्थितीवर लक्ष ठेवावे आणि योग्य वेळी विक्रीचा निर्णय घ्यावा.