Construction workers: महाराष्ट्रातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना यावर्षीच्या दिवाळीसाठी 5,000 रुपये बोनस मिळणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश कामगारांना दिवाळीच्या खर्चात मदत करणे आहे. बोनस रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, ज्याची माहिती एसएमएसद्वारे कळवली जाईल.
अर्ज प्रक्रिया 5 ऑक्टोबरपासून सुरू असून 25 ऑक्टोबरपर्यंत चालेल. 1 नोव्हेंबर 2024 रोजी पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे, आणि 5 नोव्हेंबरपासून बोनस वितरण होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी किमान 90 दिवस नोंदणी आणि कामाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
योजना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाद्वारे राबवली जात असून यामुळे 54 लाखांहून अधिक कामगारांना लाभ मिळेल.
बांधकाम कामगार योजनेत पात्र नागरिकांची माहिती:
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी: अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा लागतो.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजे.Construction workers
- कामाचा अनुभव: अर्जदाराने मागील 12 महिन्यांत किमान 90 दिवस काम केलेले असावे. याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- बँक खाते: अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे, कारण बोनस थेट बँक खात्यात जमा केला जाईल.
- कागदपत्रे: अर्जदाराला काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील, जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, वयोमर्यादेचा पुरावा, आणि बँक पासबुक.
- नोंदणी: योजना अंतर्गत लाभार्थी होण्यासाठी, कामगारांनी आधीच या योजनेमध्ये नोंदणी केलेली असावी लागते.
ही योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे केली जात आहे.Construction workers
योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा